CoronaVirus News : शासकीय कर्मचाऱ्यांचे २५० कोटी; मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 02:13 AM2020-05-19T02:13:34+5:302020-05-19T02:13:59+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यातच आपत्ती व्यवस्थापनास मोठा खर्च लागत असल्याने अडचण निर्माण झाली.

CoronaVirus News: 250 crore government employees; Contribution to CM Assistance Fund | CoronaVirus News : शासकीय कर्मचाऱ्यांचे २५० कोटी; मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान

CoronaVirus News : शासकीय कर्मचाऱ्यांचे २५० कोटी; मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान

Next

मुंबई : कोरोना आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व पुनर्वसनाच्या कामात आपलाही हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्वच आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह राज्य शासनातील गट ड पर्यंतच्या कर्मचाºयांचे मे महिन्यातील एक ते दोन दिवसांचे वेतन कपात केले जाणार आहे. त्याद्वारे तब्बल २५० कोटी रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून दिला जाणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी आदेश काढले आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यातच आपत्ती व्यवस्थापनास मोठा खर्च लागत असल्याने अडचण निर्माण झाली. हाच धागा पकडून काही संघटनांनी राज्य शासनाकडे एक ते दोन दिवसांचे वेतन मदत कार्यासाठी कापण्याचे निवेदन दिले होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष समीर भाटकर यांनी दिली.
शासनाचे गट-अ व गट-ड चे (राजपत्रित) अधिकारी व कर्मचाºयांचे दोन दिवसांचे वेतन कापले जाईल, तसेच गट ब (अराजपत्रित), गट क व ड चे कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन सहाय्यता निधीला दिले जाणार आहे. वेतन कपातीस हरकत असल्यास संबंधितांनी विभागप्रमुखास लेखी द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.
राजपत्रित गट अ व ब (४३.४८ कोटी), गट ब (अराजत्रित) तसेच क व ड (५२.२१ कोटी), शासकीय अनुदान संस्था (११८.८५ कोटी), सार्वजनिक क्षेत्रातील युनिटे (३३.१७ कोटी) यांचे योगदान राहील, असे भाटकर यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus News: 250 crore government employees; Contribution to CM Assistance Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.