शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

Coronavirus in Mumbai: मुंबईत निदानापेक्षा रुग्ण बरे झालेल्यांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 6:30 AM

दिवसभरात ७ हजार ३८१ नवे रुग्ण. मुंबईत ५ लाख ८६ हजार ६९२ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १२ हजार ४०४ वर गेला आहे. सध्या शहर, उपनगरात ८६ हजार ४१० रुग्ण उपचाराधीन आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कठोर निर्बंधाच्या पाच दिवसांनंतर सोमवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. ही बाब मुंबईकरांना दिलासादायक आहे. शहर, उपनगरात दिवसभरात ७ हजार ३८१ रुग्ण आणि ५७ मृत्यूंची नोंद झाली. तर दिवसभरात ८ हजार ५८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ४ लाख ८६ हजार ६२२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत ५ लाख ८६ हजार ६९२ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १२ हजार ४०४ वर गेला आहे. सध्या शहर, उपनगरात ८६ हजार ४१० रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत साेमवारी दिवसभरात ३६ हजार ५५६ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण ४९ लाख ८२ हजार ५३२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्क्यांवर स्थिरावला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४७ दिवसांवर आला आहे.शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १०६ आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १ हजार १७१ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २८ हजार ६५४ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

मुंबईत कोरोनाची लाट स्थिर; पालिकाफेब्रुवारी माध्यान्हपासून मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट सध्या स्थिर असल्याचे चित्र आहे. हा ट्रेंड असाच राहिल्यास कोरोनाची लाट ओसरली असे गृहीत धरता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली.१० एप्रिल राेजी  मुंबईत ९ हजार ३२७  इतके काेराेनाचे रुग्ण हाेते. १९ एप्रिलला ही संख्या ७,३८१ एवढी कमी झाली.  गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्येत पुन्हा थोडी घट दिसून येत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता कोरोनाची लाट सध्या स्थिर असल्याचे दिसून येत असल्याचा अंदाज काकाणी यांनी व्यक्त केला.

राज्यात काेराेनाचे ५८ हजार ९२४ नवे रुग्ण, ३५१ मृत्यूराज्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे किंचित दिलासादायक चित्र आहे. राज्यात दिवसभरात ५८ हजार ९२४ रुग्ण आणि ३५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३८ लाख ९८ हजार २६२ झाली असून बळींचा आकडा ६० हजार ८२४ झाला आहे. सध्या ६ लाख ७६ हजार ५२० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.राज्यात सोमवारी ५२ हजार ४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३१ लाख ५९ हजार २४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.०४ टक्के झाले असून मृत्युदर १.५६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख ७५ हजार ८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.१९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ४३ हजार ९६८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २७ हजार ८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस