शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

CoronaVirus News: राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी! कोरोनाबद्दलची दिलासादायक आकडेवारी समोर

By कुणाल गवाणकर | Published: September 22, 2020 10:16 PM

नऊ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर

मुंबई– सप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी होते आहे. मागील सात महिन्यांत राज्यात आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. दिवसभरात २० हजार २०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.३६ टक्के झाले आहे. सध्या राज्यात २ लाख ७२ हजार ४१० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा

राज्यात मंगळवारी १८ हजार ३९० रुग्ण आणि ३९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.६९ टक्के आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० झाली असून मृतांची संख्या ३३ हजार ४०७ झाली आहे. दिवसभरातील ३९२ मृत्यूंमध्ये २४३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ८१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ६८ मृत्यू हे एक आठवड्यांपेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. एकूण ३९२ मृत्यूंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ८, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा ५, भिवंडी निजामपूर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ६, पालघर २, वसई विरार मनपा ८, रायगड १७, पनवेल मनपा ४, नाशिक मनपा ९, अहमदनगर मनपा ११, अहमदनगर मनपा ५, जळगाव ११, जळगाव मनपा ६, नंदूरबार १, पुणे १८, पुणे मनपा ४२, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर १३, सोलापूर मनपा १, सातारा १४, कोल्हापूर १५, कोल्हापूर मनपा ६, सांगली १२, सांगली मिरज कुपवाड मनपा ६, रत्नागिरी ७, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा २, जालना १, हिंगोली १, परभणी ३, परभणी  मनपा १, लातूर ७, लातूर मनपा २, उस्मानाबाद ८, बीड ४, नांदेड ५, नांदेड मनपा ९, अमरावती ७, अमरावती मनपा २, बुलढाणा २, वाशिम २, नागपूर २, नागपूर मनपा १९, भंडारा ५, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा १, गडचिरोली ३ आणि अन्य राज्य/देशातील ३ रुग्णांचा समावेश आहे.हिवाळा चिंता वाढवणार! फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट; तज्ज्ञांचा दावा

पुण्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असून ८१ हजारांहून ही संख्या ५९ हजार ७७४ वर पोहोचली आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाच्या १ लाख ५ हजार २७ चाचण्या झाल्या आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६० लाख १७ हजार २८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०.६५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार २०० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४ हजार ९८२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.जपानमध्ये अनोखे डिव्हाईस लाँच, कोरोना नष्ट करण्याचा कंपनीचा दावा

मुंबईत २६ हजार ७६४ सक्रिय रुग्णांवर उपचार; रुग्ण दुपटीचा कालावधी दोन महिन्यांवरमुंबईत मंगळवारी १ हजार ६२८ रुग्ण आणि ५० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, मुंबईत १ लाख ८७ हजार ९०४ कोरोना बाधित असून बळींचा आकडा ८ हजार ५५५ झाला आहे. आतापर्यंत मुंबईतील १ लाख ५२ हजार २०४ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २६ हजार ७६४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहर उपनगरात अन्य कारणांमुळे ३८१ मृत्यू झाले आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांवर पोहोचले असून रुग्ण दुपटीचा काळ दोन महिन्यांवर गेला आहे. १५ ते २१ सप्टेंबर दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.१६ टक्के आहे. शहर उपनगरात सोमवारपर्यंत १० लाख २२ हजार ७११ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. पालिकेने मागील २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील १३ हजार ९६६ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस