शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

CoronaVirus in Ratnagiri धक्कादायक! रत्नागिरीत कोरोनाचा दुसरा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 22:08 IST

माटवण गावातील ६५ वर्षीय महिला सायन व के. इ. एम.  रुग्णालय मुंबई  येथून उपचार घेऊन दापोलीत आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुसरा बळी गेला आहे. दापोलीतील ६५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री मृत्यू झाला.

ही महिला मुंबईहून दापोली तालुक्यात ४ मे रोजी आली होती. माटवण गावातील ६५ वर्षीय महिला सायन व के. इ. एम.  रुग्णालय मुंबई  येथून उपचार घेऊन दापोलीत आली होती. दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील उपचार सुरू असताना तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी खेड तालुक्यातील अलसुरे गावातील एकाचा कोरोनामुळे बळी गेला होता.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी रात्री उशिराने दापोलीतील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील ४ तर संगमेश्वरातील ४ जणांचा समावेश आहे. रत्नागिरीत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचाही समावेश आहे. 

जिल्ह्यात आठवडाभराच्या कालावधीत ३७ कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, त्यातील ३६ जण मुंबईकर आहेत़  शनिवारी मंडणगड तालुक्यातील ११ आणि  खेडमधील २  असे एकूण १३ रुग्ण सापडले होते. त्यानंतर रात्री उशिरा दापोली तालुक्यातील दर्दे येथील ३५ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले़ हा तरुण मुंबईतील जोगेश्वरी येथून ७ मे रोजी दापोलीत गावी जाण्यासाठी आला होता़  त्याला प्रशासनाने दापोली येथील डॉ़ बाळासाहे सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या किसान भवनात विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन केले होते़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस