शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

coronavirus: कोरोनाच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने टाकले चीनला मागे, बाधितांची संख्या ८५ हजारांपार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 8:53 PM

आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे एकूण ३ हजार ७ रुग्ण सापडले असून, सापडलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९७५ झाली आहे.

मुंबई -  महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे एकूण ३ हजार ७ रुग्ण सापडले असून, सापडलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९७५ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राने आज चीनला मागे टाकले आहे. दरम्यान, आज राज्यभरात ९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन हजार ६० झाली आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात ९१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७१ (मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा-भाईंदर ४, पालघर १), नाशिक- १ (नाशिक १), पुणे- १४ (पुणे ६, सोलापूर ८), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २), औरंगाबाद-१ (जालना १), अकोला-१ (अकोला मनपा १). इतर राज्य- १ (पश्चिम बंगाम मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.)आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये ( ७३.६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०६० झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३१ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  १३ एप्रिल ते ४ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६० मृत्यूंपैकी मुंबई ४४, उल्हासनगर -५, मीरा भाईंदर – ४,सोलापूर ४ , नाशिक -१ ,पालघर -१, इतर राज्ये -१,असे मृत्यू आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईchinaचीनRajesh Topeराजेश टोपे