coronavirus: कोरोनाच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने टाकले चीनला मागे, बाधितांची संख्या ८५ हजारांपार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 08:53 PM2020-06-07T20:53:09+5:302020-06-07T20:55:05+5:30

आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे एकूण ३ हजार ७ रुग्ण सापडले असून, सापडलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९७५ झाली आहे.

coronavirus: Maharashtra overtake China in coronavirus cases, over 85,000 infected | coronavirus: कोरोनाच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने टाकले चीनला मागे, बाधितांची संख्या ८५ हजारांपार

coronavirus: कोरोनाच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने टाकले चीनला मागे, बाधितांची संख्या ८५ हजारांपार

Next

मुंबई -  महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे एकूण ३ हजार ७ रुग्ण सापडले असून, सापडलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९७५ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राने आज चीनला मागे टाकले आहे. दरम्यान, आज राज्यभरात ९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन हजार ६० झाली आहे. 

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ९१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७१ (मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा-भाईंदर ४, पालघर १), नाशिक- १ (नाशिक १), पुणे- १४ (पुणे ६, सोलापूर ८), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २), औरंगाबाद-१ (जालना १), अकोला-१ (अकोला मनपा १). इतर राज्य- १ (पश्चिम बंगाम मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये ( ७३.६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०६० झाली आहे. 

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३१ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  १३ एप्रिल ते ४ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६० मृत्यूंपैकी मुंबई ४४, उल्हासनगर -५, मीरा भाईंदर – ४,सोलापूर ४ , नाशिक -१ ,पालघर -१, इतर राज्ये -१,असे मृत्यू आहेत. 

Web Title: coronavirus: Maharashtra overtake China in coronavirus cases, over 85,000 infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.