मोठी बातमी! ...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन, ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 03:59 PM2021-02-20T15:59:21+5:302021-02-20T16:02:24+5:30

"कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. ते कुठलीही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत." (Lockdown)

Coronavirus Maharashtra Night curfew could be implement in state says Minister Vijay Wadettiwar | मोठी बातमी! ...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन, ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत

मोठी बातमी! ...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन, ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य सरकार पुन्हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करत आहे - विजय वडेट्टीवारमास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे आदी गोष्टी नागरिकांनी पाळायला हव्यात - विजय वडेट्टीवारवारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. ते कुठलीही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत - विजय वडेट्टीवार

नागपूर - राज्यात कोरोनासंदर्भातील नियमांकडे होत असलेल्या नागरिकांच्या दुर्लक्षामुळे, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यासंदर्भात सरकार वारंवार आवाहन करत आहे. मात्र, असे असतानाही काही लोकांनी हे नियम पार धाब्यावर बसवले आहेत. यामुळे, आता राज्य सरकार पुन्हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करत आहे. असे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज येथे दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. (Night curfew could be implement in state)

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०० नवे कोरोना पॉझिटिव्ह

...तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते -
नाईट कर्फ्यूसंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे आदी गोष्टी नागरिकांनी पाळायला हव्यात. लग्न समारंभातील गर्दी टाळण्यासाठी आता आम्ही मंगल कार्यालयांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. शक्यतो, सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. लोकांनी काळजी घेतली नाही, तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते.”

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. ते कुठलीही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत. यामुळे आता काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.

जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतोय; सक्रीय रुग्णांची संख्या सातशे पार

राज्यात कर्फ्यू लागू करण्यासंदर्भात काय म्हणाले वडेट्टीवार -
राज्यात कर्फ्यू लागू करण्यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधीकार देण्यात आले आहेत. संबंधित जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या कोरोनाचा प्रसार आणि तेथील गर्दी, लक्षात घेऊन नाईट कर्फ्यूसंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील.

Web Title: Coronavirus Maharashtra Night curfew could be implement in state says Minister Vijay Wadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.