शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?; राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 20:24 IST

लॉकडाउन काळात देशातील अत्यावश्यक सुविधा सोडल्या, तर धार्मिक स्थळांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. अगदी हिंदूंनीही रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि गुढीपाडवादेखील घरातच साजरा केला.

ठळक मुद्देकोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहेया काळात देशातील अत्यावश्यक सुविधा सोडल्या, तर जवळपास सर्वच बंद आहेआपल्या ट्विटमध्ये राज यांनी लॉकडाउन संदर्भातही चिंता व्यक्त केली आहे

मुंबई : कोरोनाने आता जवळपास संपूर्ण देशातच हात-पाय पसरले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात देशातील अत्यावश्यक सुविधा सोडल्या, तर धार्मिक स्थळांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. अगदी हिंदूंनीही रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि गुढीपाडवादेखील घरातच साजरा केला. याच पार्श्वभूमीवर, 'हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?', असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.

CoronaVirus, LockdownNews: छोट्या व्यवसायिकांना मोठा दिलासा, सरकारच्या आदेशानंतर 'ही' बँक देत आहे उधार पैसे

यासंदर्भात राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे, यात "कोरोना संचारबंदीत जर हिंदूंनी आपले सण घरात साजरे केलेत तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते? ह्या कोरोनाच्या संकटात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये ह्याची काळजी सरकारने घ्यावी' असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

मनसेचे अधिकृत ट्विटर अकाउंट 'मनसे अधिकृत' वर राज यांनी, देशात सुरू असलेल्या लॉकडाउनवरूनही चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात ट्विट करत, "कोरोना टाळेबंदीमुळे देशात-राज्यात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतील. अनेक लोकं भुकेने बेजार झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रचंड चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, टीव्ही माध्यमं ह्या सर्वांचा विचार सरकार करणार का?", असा सवालही  त्यांनी सरकारला केला आहे.  

CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाHinduहिंदूMuslimमुस्लीम