शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

CoronaVirus Lockdown News: ‘मिनी लॉकडाऊन’ विरोधात राज्यातील व्यापारी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:22 AM

दुकाने बंद ठेवण्यास विरोध; प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोप

नागपूर/औरंगाबाद/पुणे : सरकारने अंशतः लॉकडाऊन जाहीर केले आणि प्रत्यक्षात ‘ब्रेक द चेन’ च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप करीत राज्यात ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची दिशाभूल केली आहे. २५ दिवस दुकाने बंद ठेऊन कसे जगायचे असा संतप्त प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. हा ‘ब्रेक द चेन’ व्यावसायिकासाठी ‘ब्रेक द लाईफ’ ठरू शकतो, अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.मराठवाडा : दुकाने बंद, पण नाराजीऔरंगाबाद : अंशतः लॉकडाऊन म्हटल्याने नेहमी प्रमाणे दुकाने उघडी राहतील, या विचाराने व्यापारी गाफील होते. पण जिल्हा प्रशासनाने रात्रीतून निर्णय बदलला होता. जालना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दुकाने उघडली होती. परंतु, दुपारी पोलिसांनी शहरात फिरून सर्व दुकाने बंद केली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्ती केली. पश्चिम महाराष्ट्र : सरकारला दोन दिवसांची मुदतपुणे : आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत, दरम्यान मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करू, ऐकले तर ठीक, अन्यथा निर्णय घ्यावाच लागेल असा इशारा पुणे शहर व्यापारी महासंघाने दिला आहे. महापालिका एक सांगते, मग राज्य सरकार दुसराच आदेश काढते, अशा शब्दांत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी बंदच्या आदेशाविषयी संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवली. साताऱ्यात व्यापाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. सांगलीत सलून वगळता इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, झेरॉक्स सेंटर, बुक सेंटर, हॉटेल, मॉल वजा छोटे बझार दिवसभर सुरू होते. विदर्भ : व्यापाऱ्यांत असंतोषनागपूर : व्यापारी आणि दुकानदारांनी संभ्रावस्थेत लॉकडाऊन पाळला, मात्र या निर्णयाविरोधात सर्वत्र संताप दिसला. काही दुकानदारांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. बुलडाण्यात विविध संघटना व व्यापाऱ्यांमधून विरोध होत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे बुलडाण्यात रास्ता रोको करण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस