शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार, १ जूनला नवी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 07:17 IST

Coronavirus: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत असला तरी परिस्थिती अद्यापही गंभीर असल्याने लाॅकडाऊन आणखी पंधरा दिवसांसाठी वाढविण्यात येत आहे.

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत असला तरी परिस्थिती अद्यापही गंभीर असल्याने लाॅकडाऊन आणखी पंधरा दिवसांसाठी वाढविण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल केले जाऊ शकतात, या संदर्भात येत्या १ जून रोजी नवीन नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली. दरम्यान पुण्यातील संसर्गाचा दर कमी होत असल्याने व सर्व लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याने शनिवार,  रविवारचा लाॅकडाऊन रद्द करून अत्यावश्यक सेवा ७  ते ११ या वेळेत सुरू राहतील, असे स्पष्ट केले.पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना केंद्र शासनाने आयोजित केलेल्या जीएसटी कौन्सिलची ऑनलाइन बैठक असल्याने पुणे जिल्ह्याची बैठक राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.  टोपे म्हणाले, राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. पुण्यात या रोगाचे  ५५० रुग्ण उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिसच्या सर्व रुग्णांना मोफत उपचार दिले जावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे रुग्णांना दीड लाखापर्यंत मदत दिली जाते; पण म्युकरमायकोसिसचा शंभर टक्के खर्च शासन करणार आहे. पुण्यातील रुबी, जहांगीरसारखी खासगी हाॅस्पिटल म्युकरमायकोसिससाठी महात्मा फुले योजनेत समाविष्ट करून घेण्यात येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले. 

खासगी रुग्णालयात केल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या दरावर राज्य सरकारचा अधिकार नाही. केंद्र सरकारच्या धोरणानुसार लस उत्पादक कंपन्या २५ टक्के उत्पादन हे खासगी रुग्णालयांसाठी राखून ठेवतात. खासगी रुग्णालये कंपन्यांकडून लस विकत घेऊन ती नागरिकांना देत आहेत. खासगी रुग्णालयातील लसीकरणाचा दर राज्य सरकार ठरवू शकत नाही. मात्र, खासगी रुग्णालयांना लसीचे दर कमी ठेवण्याबाबत विनंती करणार आहे.     - राजेश टोपे  

बिलाचे ऑडिट हाेणारसर्व खासगी कोविड हाॅस्पिटलमधील शंभर टक्के बिलाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येक हाॅस्पिटल्ससाठी स्वतंत्र ऑडिटर नियुक्त करण्याचे आदेश टोपे यांनी यंत्रणेला दिले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेMumbaiमुंबई