शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...तोपर्यंत आम्ही एकही सुट्टी घेणार नाही; 'त्या' दोन हवालदारांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:01 IST

CoronaVirus Marathi News Updates in satara: गृहमंत्री अनिल देशमुखांकडून दोन्ही पोलीस हवालदारांचं कौतुक

सातारा: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. लॉकडाऊन सुरू असूनही कोरोनाग्रस्तांचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. या काळात वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. अनेक डॉक्टरांना, पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. मात्र तरीही मोठ्या हिमतीनं हे कोरोना योद्धे नेटानं आपली कामगिरी पार पाडत आहेत. पोलीस दलातल्या अशाच दोन हवालदारांचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केलं आहे.राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पंधरा हजारावर पोहोचला आहे. साडे चारशे अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. अशा बिकट परिस्थितीतही पोलीस जीवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडत आहेत. साताऱ्यातल्या दोन पोलीस हवालदारांनी कोरोना नियंत्रणात येत नाहीत तोपर्यंत एकही सुट्टी घेणार नसल्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून कौतुक केलं आहे.साताऱ्यातल्या शाहुपुरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या हवालदार निलेश दयाळ, सागर गोगावले यांनी पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं आहे. हे दोन्ही कर्मचारी बॉम्ब शोधक आणि नाशिक पथकात काम करतात. सध्या कोरोनामुळे त्यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी आहे. सध्या सातारा जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत एकही साप्ताहिक सुट्टी न घेण्याचा निर्णय दयाळ आणि गोगावलेंनी घेतला आहे. याबद्दलची माहिती त्यांनी पत्राद्वारे पोलीस अधिक्षकांना कळवली आहे.  कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतानाही एकही सुट्टी न घेण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या पोलीस हवालदारांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशंसा केली आहे. 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तावर असणाऱ्या निलेश महेंद्र दयाळ आणि सागर दिलीप गोगावले यांनी कोरोना नियंत्रणात येईपर्यंत एकही सुट्टी घेणार नसल्याचा निर्धार केला आहे. या दोघांची कर्तव्याप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे,' अशा शब्दांमध्ये गृहमंत्र्यांनी दोन्ही पोलीस हवालदारांची स्तुती केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुख