शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लासलगावचा कांदा पोहोचला बांगलादेशात! मध्य रेल्वेच्या तीन मालगाड्या रवाना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 06:52 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून एक मालगाडी ६ मे रोजी निघाली. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठविला गेला. 

मुंबई : मध्य रेल्वेची जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात सुरु आहे. मात्र आता बाहेरील देशातदेखील वाहतूक केली जात आहे. राज्यातील कांदा मध्य रेल्वेद्वारे बांगलादेशात पाठविण्यात आला आहे. कांद्याने भरलेल्या तीन मालगाड्या बांगलादेशात पाठवले आहे. तर, लॉकडाऊन काळात मध्य रेल्वेने देशभरात जीवनावश्यक सामग्रीचे ५.५ मेट्रिक टन वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून एक मालगाडी ६ मे रोजी निघाली. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठविला गेला. लासलगाव ते बांगलादेशातील दरसाना येथे आणखी ६ मालगाड्या पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.हा कांदा निर्यात करण्यासाठी वाणिज्य आणि आॅपरेटिंग विभागांकडून संभाव्य लोडर्ससह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्यात आल्या. यामुळे बांगलादेशातील डारसाणा, बेनापोल आणि रोहनपूर स्थानकांत कांद्याची निर्यात सुरू झाली. भुसावळ विभागातून भारतीय रेल्वेवरील फूटुहा, डानकुनी, चांगसारी, मालदा टाऊन, चितपूर इत्यादी विविध स्थानकांवर पाठविण्यासाठी कांदा लोड केला.मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि इतर वस्तू यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या १ लाख ७ हजार ६९८ वॅगन लोड करून मध्य रेल्वेद्वारे त्याची वाहतूक केली. अत्यावश्यक सेवेत काम करणाºया कर्मचा-यांनी दररोज २ हजार १९२ रॅकमध्ये हे लोड केल्याने देशभरात ५.५ मेट्रिक टन वाहतूक करणे शक्य झाले आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून भार भरण्याऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळहून गेला मालमध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात ३९ हजार ८९२ वॅगनमध्ये कंटेनर, ४६ हजार ४७१ वॅगनमध्ये कोळसा, ५०५ वॅगनमध्ये धान्य, ६२६ वॅगनमध्ये साखर, ९ हजार ३५५ वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, ३ हजार ७७० वॅगनमध्ये खते, १ हजार २१३ वॅगनमध्ये स्टील, ३३६ वॅगनमध्ये डी-आॅइल केक आणि १ हजार ६१३ वॅगनमध्ये सिमेंट व ३ हजार ७९२ वॅगनमध्ये विविध वस्तू भरल्या गेल्या.

टॅग्स :onionकांदाEconomyअर्थव्यवस्था