शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...तर राज्य कर्मचाऱ्यांचा दीड वर्षांसाठीचा महागाई भत्ताही गोठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:56 IST

केंद्राप्रमाणे वाढ देण्याचा सध्याचा राज्याचा फॉर्म्युला

- यदु जोशीमुंबई : केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ केली जाईल हा महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेला फॉर्म्युला कायम ठेवण्यात आला तर राज्य कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पुढील दीड वर्षांसाठीचा महागाई भत्ता गोठविला जाण्याची शक्यता आहे.केंद्रीय कर्मचाºयांना १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ या तारखांना असलेला महागाई भत्ता गोठण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला होता. केंद्र सरकार ज्या प्रमाणात महागाई भत्ता वाढवेल त्याप्रमाणात राज्य कर्मचाऱ्यांनादेखील महागाई भत्त्याची वाढ दिली जाईल, असा निर्णय अजित पवार हे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री असताना नोव्हेंबर २०११मध्ये कर्मचारी आणि अधिकारी संघटनांच्याबरोबर बैठक घेऊन करण्यात आला होता. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यास मान्यता दिली होती.त्यापूर्वीची ३४ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी देय होती. मात्र ती न देता केंद्राप्रमाणे राज्यातही हा भत्ता देण्याचा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०१२ पासून करण्यात आली, ती आजपर्यंत सुरू आहे. आता केंद्र सरकारने महागाई भत्ता दीड वर्षांसाठी गोठविला असल्याने राज्यातही तो गोठविला जाईल, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास तो आकडा किमान एक हजार कोटी रुपये इतका असेल. वित्त विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, अद्याप त्याबाबतचा कुठलाही निर्णय झालेला नाही. जो फॉर्म्युला आधी स्वीकारण्यात आला होता. त्याला अपवाद करून महागाई भत्त्याची वाढ द्यायची का याचा निर्णय सरकार घेईल. राज्यात १७ लाख सरकारी कर्मचारी असून ६ लाख निवृत्तीवेतनधारक आहेत.दहा महिन्यांची थकबाकी मिळावीराज्यावरील कोरोनाचे संकट आणि शासनाची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता दीड वर्षांचा महागाई भत्ता गोठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला तर त्यास आमचे सहकार्य राहील. आतापर्यंतची दहा महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी आहे. ती मात्र शासनाने द्यायला हवी. त्यासाठी कोरोनाच्या संकटानंतर आम्ही आग्रही भूमिका घेऊ.- ग. दि. कुलथे, नेते, राजपत्रित अधिकारी महासंघ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMantralayaमंत्रालय