शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 13:45 IST

संकटप्रसंगी  सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य विषयक वस्तुंची आवश्यकता असून अशा वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर,  मास्क, व्हेंटीलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करावा, असे आवाहन देसाई यांनी केले. 

मुंबई -  देशावर कुठलेही संकट आल्यास उद्योग क्षेत्र नेहमीच मदतीसाठी पुढे येते. सध्या देशावर कोरोनाचे संकट उभे असून यावर मात करण्यासाठी उद्योगांनी आरोग्याशी निगडीत साधन-सामुग्रीचा शासनाला पुरवठा करावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

 कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशात संचारबंदी जारी करण्यात आलेली असून यामुळे अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. पंरतु अत्यावश्यक सेवा म्हणून काही उद्योगांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक वस्तुनिर्मितीसह माहिती तंत्रज्ञान व अनुषांगिक सेवा, कृषी व अन्न प्रक्रिया आधारित उद्योग,  दाळ व राईस मिल,  डेअरी उद्योग,  खाद्य व पशुखाद्य उद्योग यांचा समावेश आहे. अशा संकटप्रसंगी  सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य विषयक वस्तुंची आवश्यकता असून अशा वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर,  मास्क, व्हेंटीलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करावा, असे आवाहन देसाई यांनी केले.   यासाठी समन्वयक म्हणून मराठी  भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे  (sec.marathi@maharashtra.gov.in) याशिवाय  उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी (psec.industry@maharashtra.gov.in), उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे (didci@maharashtra.gov.in), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन (ceo@maharashtra.gov.in), मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील समन्वयक प्रधान सचिव भूषण गगराणी (ccrmaharashtra.aid@maharashtra.gov.in), अन्न व औषध प्रशासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी (psec.mededu@maharashtra.gov.in) यांच्याशी संपर्क करावा, असेही श्री. देसाई यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSubhash Desaiसुभाष देसाईmedicinesऔषधं