शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus: राज्यासह मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:52 IST

३२८ नवे रुग्ण । एकूण ३ हजार ६९० बाधित

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने रुग्णसंख्येचा वेग मंदावला असे सांगितले असले तरी आता शनिवारी दिवसभरात राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या वाढली आहे. शनिवारी राज्यात तब्बल ३२८ कोरोना रुग्णांचे निदान झाले, यातील एकट्या मुंबईत १८४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३ हजार ६९० वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण २ हजार २६८ कोरोना रुग्ण झाले आहेत. कोरोनामुळे राज्यातझालेल्या मृत्यूंची संख्या आता २१६ झाली आहे, तर मुंबईत ही संख्या १२६ इतकी आहे.राज्यात शनिवारी ११ मृत्यूंची नोंद झाली. शनिवारी झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईतील ५ आणि पुणे येथील ४, तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष, तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत, तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये ८२ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.६३ हजार ४७६ जणांचे नमुने निगेटिव्हआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिका कार्यक्षेत्रात बाधितांची संख्या शनिवारी अनुक्रमे १५ आणि १३ ने वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६४ इतकी झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस