शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मी जगलो माझे जगणे...; मृत्यूशय्येवर असताना 'त्यांनी' तरुणासाठी बेड नाकारला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 23:39 IST

८५ वर्षीय दाभाडकर यांना कोरोना संक्रमण झाले. ऑक्सिजन धोक्याच्या पातळीवर ५५ पर्यंत उतरले होते. अशात हॉस्पिटल आणि बेड मिळणे कठीण झाले होते.

ठळक मुद्दे२२ एप्रिल रोजी संध्याकाळी गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला. खिडकीच्या बाहेर एक महिला स्वत:च्या नवऱ्याला बेड मिळावा व प्राण वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे त्यांच्या नजरेत पडले.दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्राण सोडला.

नागपूर : म्हणतात ना... स्वत:साठी जगला तो काय जगला, दुसऱ्यासाठी जगला तो चिरंजीव झाला. नियतीच्या आलेखात त्याच्या अमरत्वाची नोंद झाली. असाच प्रसंग नागपुरात काल-परवा अनुभवास आला. स्वत: मृत्यूशय्येवर असतानाही दुसऱ्याच्या जगण्याची चिंता असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांनी आपला बेड तरुणासाठी रिकामा केला आणि दुसऱ्याच दिवशी गतप्राण झाले.

८५ वर्षीय दाभाडकर यांना कोरोना संक्रमण झाले. ऑक्सिजन धोक्याच्या पातळीवर ५५ पर्यंत उतरले होते. अशात हॉस्पिटल आणि बेड मिळणे कठीण झाले होते. शिवाय, घरातील सगळीच मंडळी संक्रमित असल्याने अडथळ्यांचा पहाड होताच. अखेर २२ एप्रिल रोजी संध्याकाळी गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला. ॲम्ब्युलन्समधून नारायणराव हॉस्पिटलला गेले. एक्स-रे काढल्यावर संक्रमण धोक्याच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत उपचार सुरू झाले आणि खिडकीजवळचा बेड त्यांना मिळाला. बेडवर येत नाही तोच, त्यांना खिडकीच्या बाहेर एक महिला स्वत:च्या नवऱ्याला बेड मिळावा व प्राण वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे त्यांच्या नजरेत पडले. काही क्षण विचार केला आणि लागलीच जावयांना बोलावले. माझे वय ८५, माझ्या मागच्या सगळ्याच जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आणि मी माझे जगणे जगलो आहे. आता जगण्याची गरज त्या पेशंटला आहे. तेव्हा हा बेड रिकामा करतो आणि घरी जाऊ या... असे ते उच्चारले. घरी फोन केला तर सगळेच अचंबितही झाले. डॉक्टरांपुढे नारायणरावांची ही भावना व्यक्त केली तेव्हा डॉक्टरांनी रुग्णाला वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे स्पष्ट केले. मात्र, नारायणराव ऐकायला तयार नव्हते आणि मी बेड रिकामा करीत असल्याचे लिहून देत असल्याची घोषणा केली आणि लिहूनही दिले. ॲडमिट झाल्याच्या अवघ्या दोन तासात नारायणरावांनी बेड रिकामा केला. घरी परतले. दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्राण सोडला. एखाद्या सिनेमातील साजेसा हा प्रसंग प्रत्यक्षात दाभाडकर कुटुंबात घडला. 

बाबा चिरंजीवी ठरलेबाबांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला तणाव देणारा होता. मात्र, त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून एक संस्कार दिला, याची जाणीव तत्क्षणी झाली आणि आम्ही त्यांच्या त्या निर्णयाचे स्वागत केले. खऱ्या अर्थाने बाबा चिरंजीवी ठरले. - आसावरी दाभाडकर कोठीवान

सध्याच्या स्थितीपुढे सगळ्याच यंत्रणा हतबल आहेत. नारायणराव यांना बेड मिळाला, उपचारही सुरू झाले होते. मात्र, त्यांना दिसलेल्या विदारक स्थितीत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता बेड सोडला, ही या काळातील सर्वात मोठ्या औदार्याची वृत्ती आम्ही मानतो. नारायणराव जगू शकले नाही, ही खेदाची बाब. मात्र, आपल्या औदार्याने त्यांनी स्वतःचे नाव अमर केले. - डॉ. अजय हरदास, कोविड इंचार्ज, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधी नगर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस