शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 'नरेंद्र मोदी कोरोनाच्या संकटाबाबत किती गंभीर आहेत?', काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची  टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 14:33 IST

CoronaVirus : पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ आज सकाळी प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला एकजूट ठेवण्याचे व रविवारी सायंकाळी आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी घरोघर दिवे लावण्याचे आव्हान केले आहे.

अहमदनगर : कोरोनाशी लढण्यासाठी आज जनतेला मदत करण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय साहित्य देखील हवे आहे. मात्र या सुविधा देण्याऐवजी पंतप्रधान जर लोकांना दिवे लावायला सांगत असतील तर ते स्वतः या संकटाबाबत किती गंभीर आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ आज सकाळी प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला एकजूट ठेवण्याचे व रविवारी सायंकाळी आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी घरोघर दिवे लावण्याचे आव्हान केले आहे. यावर बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. पंतप्रधान कधी जनतेला टाळ्या वाजवल्या सांगतात, तर कधी दिवे लावायला सांगतात. मात्र आज देशाची गरज काय आहे, जनतेला काय सुविधा आवश्यक आहे,  याचा ते विचार करणार आहेत का असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी म्हणाले की, ही लढाई एकटा कसा लढू असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. किती काळ ही परिस्थिती राहणार हे सर्वांच्या मनात आहे. पण आपण घरात असलो तरी एकटे नाही, सामूहिक शक्तीने आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत. जनता ईश्वराचा अवतार असतो असे समजले जाते. देश ही इतकी मोठी लढाई लढताना आपल्या शक्तीचे दर्शन वारंवार घडवून देत आहे. आपला मार्ग अधिक स्पष्ट करतो. कोरोनाच्या अंधकारातून निरंतर प्रकाशाकडे जायचे आहे. कोरोना संकटामुळे गरीब जास्त प्रभावित झाले आहेत. या संकटातून त्यांना नवीन ऊर्जा मिळवून द्यायची आहे, नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

याचबरोबर, या कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचे आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटे हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभे राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातNarendra Modiनरेंद्र मोदी