शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मरकजला परवानगी कशी दिली?; गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुन्हा केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 14:30 IST

Coronavirus मरकजवरुन अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल

मुंबई: तबलिगी जमातच्या निझामुद्दीनमधील मरकजवरुन पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रावर निशाणा साधला. तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं खुद्द केंद्राचं आरोग्य मंत्रालय सांगतंय. दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानशी कशी दिली? त्यामुळे निर्माण झालेल्या संकटाला जबाबदार कोण?, असे प्रश्न उपस्थित करत देशमुख यांनी अमित शहांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकजमुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयानंच याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात होणारा तबलिगी जमातचा कार्यक्रम पोलिसांनी रोखला. मग दिल्ली पोलिसांना ते पाऊल का उचलता आलं नाही? त्यांना कार्यक्रमाला परवानगी कशी दिली? मग या संकटाला जबाबदार कोण?, असे प्रश्न देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले. दिल्लीतले पोलीस केंद्राच्या अखत्यारित येत असल्यानं देशमुख यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनी कालच एका पत्राद्वारे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य केलं होतं. त्यांनी पत्रातून काही प्रश्न विचारत अजित डोवाल यांच्यावरच शंका उपस्थित केली होती. मुंबईतील वसई येथे १५ आणि १६ एप्रिल रोजी जवळपास ५० हजार तबलिगी एकत्र जमणार होते. मात्र, राज्य सरकार आणि गृहविभागाने परवानगी नाकारली. मग केंद्र सरकारनं दिल्लीतील कार्यक्रमाला परवानगी कशी दिली? असा प्रश्न देशमुख यांनी विचारला होता. राज्यात आणि देशात जो कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? असा सवाल देशमुख यांनी पत्रातून उपस्थित केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनी या विषयावर बोलायचं का टाळलं ? डोवाल यांना भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मौलाना कुठं गायब झाले, मौलाना आता कुठं आहेत? असे प्रश्न विचारत, तबलिगीशी संबंध तुमचे! असा प्रश्नार्थक आरोपही देशमुख यांनी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयावर केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखAmit Shahअमित शहा