शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 13:56 IST

CoronaVirus News: रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत असल्यानं उद्धव ठाकरे सरकारनं लॉकडाऊन वाढवला

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचं मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी पत्राद्वारे सर्व विभागांना कळवलं आहे. 'राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातला लॉकडाऊन ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कायम असेल,' असं अजॉय मेहता यांनी पत्रात म्हटलं आहे. काल राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ हजार ६०६ नं वाढला. कोरोना रुग्णांची संख्या एकाच दिवशी झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे राज्यातल्या बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज रात्री संपणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून राज्यासह देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादमधील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा