शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यात चार लाख रुग्ण कोरोनामुक्त; दीड लाख जणांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 00:39 IST

राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के इतके आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १२,६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३६४ मृत्यू झाले

मुंबई : राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने चार लाखांचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी दिवसभरात १०,४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख १ हजार ४४२ इतकी झाली आहे.राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के इतके आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १२,६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३६४ मृत्यू झाले. सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मृत्युदर ३.३९% एवढा आहे.आज नोंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ४६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ४१ मृत्यूंपैकी ठाणे जिल्ह्यात १६, सांगली ७, पुणे ६, रायगड ३, बीड २, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सोलापूर, जळगाव, लातूर आणि नाशिक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज निदान झालेल्या ३६४ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा ४७, ठाणे ५, ठाणे मनपा १९, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा ४, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी-निजामपूर मनपा ४, मीरा-भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई-विरार मनपा ७, रायगड ८, पनवेल मनपा १, नाशिक ७, नाशिक मनपा-११, मालेगाव मनपा १, अहमदनगर १, अहमदनगर मनपा ४, धुळे १, जळगाव - ६, जळगाव मनपा ६, पुणे ३१, पुणे मनपा ५६, पिंपरी-चिंचवड मनपा १३, सोलापूर ३, सोलापूर मनपा २, सातारा ७, कोल्हापूर ८, कोल्हापूर मनपा ६, सांगली ३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा १६, रत्नागिरी ४, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा ४, अकोला १, अमरावती १, अमरावती मनपा १, बुलडाणा २, वाशिम १, नागपूर २, नागपूर मनपा १६, गोंदिया १, चंद्रपूर १, इतर राज्य २४ आदी रुणांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस