शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : भारतीयांना त्वरित लस मिळावी म्हणून आर्थिक जोखीम उचलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 06:09 IST

भारतीयांना त्वरित लस उपलब्ध होण्यासाठी हा आर्थिक धोका आम्ही पत्करतो आहोत, असे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले.

सुकृत करंदीकरपुणे : इंग्लंडमधील आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कोविड-१९ वरील लशीचे संशोधन चालू आहे. या लशीच्या मानवी चाचण्याही सुरू झाल्या आहेत. या लस संशोधनाला ८० टक्के यश मिळण्याची खात्री ‘आॅक्सफर्ड’ला वाटते. ही शक्यता गृहीत धरुन तातडीने लस उत्पादन करण्यासाठी मोठी आर्थिक जोखीम उचलण्यास ‘सिरम’ तयार झाली. भारतीयांना त्वरित लस उपलब्ध होण्यासाठी हा आर्थिक धोका आम्ही पत्करतो आहोत, असे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडे असणारी उच्च दर्जाची उत्पादन क्षमता लक्षात घेऊन ‘आॅक्सफर्ड’ने या लशीच्या भारत आणि भारताबाहेरील उत्पादनाचे हक्क ‘सिरम’ला दिले आहेत. ‘सिरम’ ही दीड अब्जांपेक्षा जास्त लशींची निर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.>लस यशस्वी ठरल्यानंतरदेखील त्याचे उत्पादन घेण्यास पुढील सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागतो. हा वेळ वाया जाऊ नये, यासाठी आतापासूनच निर्मिती व्यवस्था उभी करत आहोत.कोरोनावरील लस उत्पादनासाठी नवी उत्पादनक्षमता निर्माण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही करत आहोत.कोडोजेनिक्स या अमेरिकी कंपनीसोबत लशीचे स्वतंत्र संशोधन सुरू आहे. यातून २०२१ पर्यंत लस बाजारात आणण्यात आम्ही यशस्वी होऊ. आमच्या या संशोधनाचे पेटंट आम्ही घेणार नाही.>कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूवरील लशीचे उत्पादन येत्या आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत भारतात उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ५० लाख लशींचे उत्पादन दोन आठवड्यांच्या आत करण्याची ‘सिरम’ची क्षमता आहे. पुढच्या सहा महिन्यांत ही क्षमता दुपटीने वाढवता येईल.- अदर पूनावाला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस