शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
2
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
4
कोहली बनला लिमिटेड ओव्हर्सचा 'किंग', सचिन तेंडुलकरचा १८,४३६ धावांचा विक्रम मोडला!
5
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
6
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
7
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
8
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
9
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
10
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
11
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
12
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
13
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
14
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
15
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
16
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
17
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
18
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
19
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
20
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत

CoronaVirus: कोरोनाला कसं रोखता येईल?; आरोग्य मंत्र्यांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 17:51 IST

coronavirus: उपलब्ध वैद्यकीय साहित्याची आरोग्य मंत्र्यांनी दिली आकडेवारी

मुंबई: कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट कमी असल्याच्या काही तक्रारी येत होत्या. मात्र सर्व वैद्यकीय साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं टोपे यांनी आकडेवारीसह सांगितलं. मुंबईत ९० कन्टेन्मेंट झोन सुरू करण्यात आले असून त्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरवल्या जात असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. सध्या राज्यात अडीच लाख एन-९५ मास्क उपलब्ध आहेत. याशिवाय २५ हजार पीपीई किट्स, २५ लाख ट्रिपल लेअर मास्क, दीड हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. काही खासगी रुग्णालयांकडेही व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास त्यांचा वापर केला जाईल, असं टोपेंनी सांगितलं.एन-९५ मास्क, पीपीई किट्सचं प्रमाण अपुरं असल्याच्या तक्रारींवरदेखील आरोग्यमंत्र्यांनी भाष्य केलं. सर्व डॉक्टरांनी एन-९५ मास्क, पीपीई किट्स वापरणं गरजेचं नाही. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी तसा आग्रह धरू नये. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एन-९५ मास्क, पीपीई किट्स वापरणं गरजेचं आहे. तशी मार्गदर्शक तत्वंदेखील आहेत. सगळ्याच डॉक्टरांनी एन-९५  मास्क आणि पीपीई किट्सची मागणी केल्यास त्यांचा तुटवडा जाणवेल, असंदेखील ते पुढे म्हणाले.कोरोनाची बाधा झाल्यावर रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्यावर भर द्यावा, असं आवाहन राजेश टोपेंनी केलं. व्हिटामीन सी असलेल्या फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला. लोकांनी मोसंबी, संत्री, आवळा अशी फळं खावीत. गरम पाणी प्यावं. हळद, जिरं, लसूण, धणे यांचा जेवणात समावेश करावा, असं टोपे म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे