शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दारोदारी जाऊन 'त्यांनी' घेतला रुग्णांचा शोध; नेटाने लढून तालुका केला कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 07:39 IST

डाॅ. दीपा कुळकर्णी: लसीकरणातही अग्रेसर जिल्ह्यात लसीकरणातही कळमेश्वर तालुका अग्रेसर आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९२ टक्के इतके आहे. 

नागपूर :  काेराेना महामारीचा काळ हा आराेग्य सेवकांसाठी खूप माेठे आव्हान हाेते. प्रशासकीय सेवेतील आराेग्य अधिकाऱ्यांनी शासकीय कर्तव्य आणि नागरिकांची सुरक्षा या दाेन्ही जबाबदाऱ्या अतिशय नेटाने पार पाडल्या. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुका काेराेनामुक्त करण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. दीपा कुळकर्णी हे नाव त्यापैकीच एक. कर्तव्य पार पाडत असताना त्या स्वत:ही कोरोनाग्रस्त झाल्या. त्याचवेळी पतीलाही कोरोना झाला. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी धीर सोडला नाही. कोरोनावर मात करून त्या पुन्हा कामाला लागल्या आणि आपला तालुका कोरोनामुक्त केला. 

कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वीच शासनाकडून सर्व आरोग्य यंत्रणेला अलर्ट राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार अधिकारी तयारीत होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण सापडला. पहिल्या लाटेच्यावेळी सर्वच नवीन होते. ग्रामीण भागात तर मोठी गंभीर स्थिती होती. सुविधाही नव्हत्या. नवीन रुग्ण सापडला, तर त्याला समाजाकडूनच बहिष्कृत केले जात होते. घरी रुग्ण सापडला, तर कुणी पुढे व्हायला तयार होत नव्हते. अशावेळी रुग्णाला शोधून काढणे, त्याचे समुपदेशन करणे, त्याच्या कुटुंबीयांची समजून काढून त्यांनाही तपासणीसाठी तयार करणे, तसेच उपचारासाठी त्याला भरती करून घेणे, यासोबतच गावातील लोकांचे व समाजाचेही मार्गदर्शन करणे, समुपदेशन करणे ही सर्व कामे त्यांनी पार पाडली. लसीकरणातही अग्रेसर जिल्ह्यात लसीकरणातही कळमेश्वर तालुका अग्रेसर आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९२ टक्के इतके आहे. 

आधी सनस्ट्रोक, मग गाठले कोरोनाने पहिल्या लाटेत काम करीत असतानाच डाॅ. कुळकर्णी यांना सनस्ट्रोक झाला. आजारपणातही त्यांनी जबाबदारी नेटाने सांभाळली. दुसरी लाट अधिक तीव्र होती. ऑक्सिजन, बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. कळमेश्वरमध्येही भयावह स्थिती होती. आरोग्य अधिकारी म्हणून डाॅ. कुळकर्णी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. यात त्या स्वत: कोरोनाग्रस्त बनल्या होत्या. त्यांचे पतीही कोरोनाच्या विळख्यात सापडले.  पती-पत्नी दाेघेही एकाचवेळी कोरोनाग्रस्त होते. घरी एकटा मुलगा, अशा कठीण प्रसंगातूनही त्यांनी मार्ग काढला. कोरोनातून बरे होऊन त्या पुन्हा जोमाने कामाला लागल्या आणि अखेर कळमेश्वर तालुका कोरोनामुक्त करून दाखविला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या