शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : वृत्तपत्र वितरणबंदीच्या निर्णयावर फेरविचार व्हावा - शिवाजीराव मोघे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 17:57 IST

वृत्तपत्र वितरणावर बंदीचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याविषयी फेरविचार केला जावा

यवतमाळ - कोरोना संकटाच्या काळात वर्तमानपत्र विश्वासार्ह माध्यम असल्याची ग्वाही अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेली आहे. असे असताना वृत्तपत्र वितरणावर बंदीचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याविषयी फेरविचार केला जावा, असे मत माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले आहे. स्टॉलवर वृत्तपत्र विक्रीसाठी होणारी गर्दी धोकादायक ठरेल, अशीही चिंता अ‍ॅड.मोघे यांनी व्यक्त केली आहे.वृत्तपत्र घरोघरी पोहोचले नाही तर, नागरिकांना सविस्तर आणि आपल्या गावातील, परिसरातील माहिती उपलब्ध होणार नाही. बातम्याच नव्हे तर इतरही माहिती वृत्तपत्रात असते. ही माहिती जाणून घेण्यापासून वाचक मुकतील. वृत्तपत्राची छपाई करायची, पण वितरणावर बंदी हे कुठले धोरण, असा प्रश्न अ‍ॅड.मोघे यांनी उपस्थित केला आहे. सामान्य माणसापर्यंत वृत्तपत्र पोहोचते. अलीकडे उलटसुलट बातम्यांना पेव फुटले आहे. यामुळे नागरिक संभ्रमात पडतात. वस्तुनिष्ठ बातमी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र करीत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या लोकांना विविध घटकांकडून मदतीचा हात दिला जात आहे. शासनाला मदतनिधी देण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्याने मदत करणारे अनेक हात पुढे येत आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून मदत निधी दिला जात आहे. तेरवीचा खर्च टाळून गरजूंना अन्नदान केले जात आहे. लोकजागृतीचे काम वृत्तपत्र करीत आहे. यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. शासनाला या माध्यमातून मोठा हातभार लागत आहे. त्यामुळे वृत्तपत्र वितरणावरील बंदीबाबत फेरविचार करावा, असे अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMediaमाध्यमेShivajirao Mogheशिवाजीराव मोघे