शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

CoronaVirus News: राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...

By कुणाल गवाणकर | Updated: November 22, 2020 18:01 IST

CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा लॉकडाऊनचा (Lockdown In Maharashtra) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. दोन-तीन दिवस परिस्थितीची समीक्षा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं पवार म्हणाले आहेत. संबंधित विभागांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्सव काळात अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.आम्ही २ ते ३ दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतर लॉकडाऊन करायचा की नाही, याबद्दलचा निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले. 'दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बरीच गर्दी पाहायला मिळाली. कोरोना या गर्दीत आपोआप मरून जाईल की काय अशी परिस्थिती होती. कोरोनाची दुसरी लाट येईल असं आता म्हटलं जात आहे. सरकारनं अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,' असं पवार यांनी सांगितलं.मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार; मोठी घोषणा करण्याची शक्यताकोरोना रुग्णांचा आकडा वाढलागेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे ५ हजार ७६० नवे रुग्ण आढळून आले. तर ६२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ४६ हजार ५७३ वर पोहोचली. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख ४७ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७९ हजार ८७३ जणांवर उपचार सुरू आहेत.मुख्यमंत्री संवाद साधणारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करताना राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, पुन्हा लॉकडाऊन की वीज बिल सवलतीबाबत मोठी घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कोणत्या घोषणा होणार?दिवाळीनंतर देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर मुंबईत सुद्धा कोरोनाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा लॉकडाऊनबाबत भाष्य करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, शाळा पुन्हा सुरु करणे, वाढीव वीजबिलावर सवलत यांसह अनेक विषयांवर बोलणार असल्याची चर्चा आहे. मात्र, उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या विषयावर बोलणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे