शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus चिंताजनक! राज्यात दिवसभरात मृतांचा आकडा पन्नाशी पार; ३९९ रुग्ण बरे झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 21:57 IST

मुंबईमध्ये आज नव्या रुग्णांची संख्या कालपेक्षा दीडशेने वाढली आहे. तर दिवसभरात १९ मृत्यू झाले आहेत. मृत्यूंचा हा आकडा काहीसा दिलासा देणारा आहे.

मुंबई : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत असून मृत्यूचा आकडाही मुंबईतच जास्त आहे. त्यातच शनिवारी राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २०००० पार गेला होता. आजची आकडेवारी चिंतेत भर घालणारी आहे. 

मुंबईमध्ये आज नव्या रुग्णांची संख्या कालपेक्षा दीडशेने वाढली आहे. तर दिवसभरात १९ मृत्यू झाले आहेत. मृत्यूंचा हा आकडा काहीसा दिलासा देणारा आहे. आज मुंबईत ८७५ नवे रुग्ण सापडले असून ६२५ संभाव्य कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर राज्यात आज १२७८  नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे आज ३९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.  राज्यात आजपर्यंत एकूण ४१९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

मात्र, मृतांच्या आकड्याने पन्नाशी पार केली आहे. हा आकडा आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. आज राज्यात ५३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण रुग्णसंख्या २२,१७१ वर गेली असून एकूण बळींची संख्या ८३२ झाली आहे. 

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १९, पुण्यातील ५ , जळगाव शहरात ५, धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवड मध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदूरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील १४  मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे.

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus मुंबईकरांसाठी चिंताजनक! नव्या रुग्ण संख्येत मोठी वाढ; बळींचा आकडा ५०० पार

CoronaVirus लॉकडाऊन संपेना! वैतागून हजारो कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे परराज्यात रवाना

काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार

लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर

एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या