शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

coronavirus: सव्वादोन हजार कोटींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, लॉकडाउनचा ‘पणन’ला मोठा फटका

By यदू जोशी | Published: May 16, 2020 6:24 AM

कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे.

- यदु जोशीमुंबई : प्लॉकडाऊनच्या काळात जवळपास दीड महिना कापसाची खरेदी बंद असल्याने सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांचा ५० लाख क्विंटलहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आजही पडून आहे.कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे. कापसाची आवक होणाºया वाहनांची संख्या व अशा केंद्रांवर काम करणाºया कामगारांच्या संख्येवर संबंधित जिल्हाधिकाºयांनी निर्बंध आणले असल्यामुळे कापूस खरेदीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी खरेदी पूर्ण होणे आवश्यक आहे.पणन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे शेतमाल मोठ्या बाजार समित्यांमध्ये पाठविता आला नाही.३०६ बाजार समित्यांपैकी सुमारे २६० ते २७० बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे व्यवहार सुरू असले तरी त्याची गती अतिशय धीमी आहे. मुंबई, पुण्यासारख्या बाजार समित्यांमध्ये ग्रेडिंग, पॅकिंगचे काम प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारी कामगार करतात. रावेरच्या केळी बाजारात परप्रांतीय, विदर्भातील कापूस खरेदी केंद्रांवर तेलंगणातील तर नाशिकच्या कांदा मार्केटमध्ये पश्चिम बंगालमधील मजूर काम करतात. अनेक जण मूळ गावी गेल्याने या बाजारांना फटका बसला आहे.खासगी बाजार, एकल परवानाधारक व थेट खरेदी परवानाधारकांनी कामगाराअभावी खरेदी बंद ठेवली. ई नाम व्यवस्थेलाही कोरोनाचा फटका बसला.आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे एप्रिल २०१९ मधील २.४५ लाख मे. टन निर्यातीच्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये २.३० लाख मे. टन झाली आहे.व्यवस्था पूर्ववदावर आणण्याचे प्रयत्नशेतकरी आणि ग्राहकांना जोडणारी अत्यंत परिणामकारक अशी पणन व्यवस्था राज्यात पूर्वीपासून आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ती कोलमडली आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.- बाळासाहेब पाटील,मंत्री, पणन विभागअसे होत आहे नुकसानलॉकडाऊनपासून सर्व बाजार समित्यामधील जनावरांचा बाजार बंद आहे. पुरेशा प्रमाणात शेतमजूर / काढणीयंत्र चालवणारे वाहनचालक उपलब्ध नसल्याने काही प्रमुख शेतमालाच्या काढणीवर परिणाम झाला.शेतमाल बाजार आवारात पोहोचल्यानंतर तेथे मालाची हाताळणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कामगार वर्ग उपलब्ध नसल्याने नाशवंत शेतमाल काढण्याच्या प्रक्रियेस विलंबबाजार आवारात शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे हमाल, मापारी या घटकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.हॉटेल, रेस्टॉरंट वसतिगृहातील कँटीन, इतर धार्मिक सामाजिक, कौटुंबिक समारंभ बंद असल्यामुळे शेतमालाची मागणी कमी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती