शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाचे आणखी एक हजार मृत्यू लपविले; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 01:31 IST

वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुदतवाढ मिळालेली नाही. विदर्भ व मराठवाड्यातील मंत्र्यांनी याविषयी कॅबिनेटमध्ये आवाज उठवावा, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अमरावती/अकोला : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते असून, राज्य सरकार मृत्यूंच्या आकड्यांची लपवाछपवी करत आहे. यापूर्वी सरकारने १,३२८ मृत्यू लपविले होते. ते जाहीर करावे लागले असून, आता आणखी १ हजार मृत्यू लपविल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सोमवारी त्यांनी अमरावती आणि अकोला जिल्ह्यात भेटी देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत; मात्र राज्य सरकार गांभीर्याने काम करत नाही. कोरोनाशी लढाई करण्यापेक्षा हे सरकार आकड्यांशी खेळत आहे. सरकारने १ हजार मृत्यूंची लपवाछपवी केली असून, याबाबतची सविस्तर आकडेवारी आपण सरकारला कळविली आहे.

वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुदतवाढ मिळालेली नाही. विदर्भ व मराठवाड्यातील मंत्र्यांनी याविषयी कॅबिनेटमध्ये आवाज उठवावा, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कर्जमाफी नाही अन् हमीनंतर कर्जही नाहीराज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी निघाली. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही त्यांना आता नवे कर्ज मिळत नाही. सरकारने बँकांना हमी दिली असली तरी या हमीवर कर्जवाटप होत नाही, त्यामुळे बँकांनी सरकारचा आदेशच जुमानला नसल्याने शेतकºयांची फरफट होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारBJPभाजपा