CoronaVirus: साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई; एकनाथ शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 12:40 AM2020-04-19T00:40:54+5:302020-04-19T07:02:40+5:30

कृत्रीम टंचाई करून जनतेला वेठीस न धरण्याचे आवाहन

CoronaVirus action to be taken against traders holding stock warns Eknath Shinde | CoronaVirus: साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई; एकनाथ शिंदेंचा इशारा

CoronaVirus: साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई; एकनाथ शिंदेंचा इशारा

Next

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाºयांनी कृत्रिम टंचाई निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविण्यास सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे साठेबाजी करून जनतेस वेठीस धरणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यापारावरही झाला आहे. पाच दिवस मार्केट बंद राहिल्यामुळे मुंबई, नवी मुंबई परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. डाळी, कडधान्यासह अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. किरकोळ दुकानदारांनीही माल मिळत नसल्याचे कारण देऊन दर प्रचंड वाढविले आहेत. काही व्यापाºयांनी साठेबाजीला सुरुवात केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहिला पाहिजे. साठेबाजी करू नये. साठेबाजी व भाववाढ करून जनतेला वेठीस धरल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Web Title: CoronaVirus action to be taken against traders holding stock warns Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.