शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : राज्यात दिवसभरात 6695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7120 कोरोनामुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 21:21 IST

CoronaVirus in Maharashtra : राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 % एवढा आहे.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. 

राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,89,62,106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,36,220 (12.94 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,46,501 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,776 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

राज्यात एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (76), अमरावती (87), वाशिम (94),  गोंदिया (95), गडचिरोली (31)   या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 974 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर भिवंडी निजामपूर महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, हिंगोली,  परभणी, अकोला महानगरपालिका, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या अकरा महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत दिवसभरात 324 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!मुंबईत गेल्या 24 तासात 324 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 315 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,13,476 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4529 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1591 दिवसांवर गेला आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 283 रुग्णठाणे जिल्ह्यातील महापालिका, गावपातळीवर 283 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 13 जणांचा मृत्यू गुरुवारी झाला आहे. ठाणे शहरात 59 रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. कल्याण डोंबिवलीला 83 रुग्ण वाढीसह तीन मृत्यू झाले. उल्हासनगरमध्ये सहा रुग्ण वाढ झाली असून दोन मृत्यू झालेत. भिवंडी परिसरात एकही रुग्ण आणि मृत्यू नाही. मीरा भाईंदरला 19 रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू  आहे. अंबरनाला सहा रुग्ण वाढले असून एक मृत्यू आहे. बदलापूरमध्ये 28 रुग्णांची आज वाढ असून एक मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील गावपाड्यात 24 रुग्ण सापडले असून एका मृत्यूची नोंद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्र