शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

CoronaVirus: राज्यात ६४ टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित आढळल्याने चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:05 IST

तरुणांची संख्या अधिक; पाच हजारांपेक्षा जास्त बाधित रुग्ण

- स्नेहा मोरे मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसागणिक गंभीर होते आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णांनी आता पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी रात्रंदिवस झटत असताना आता कोरोनाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६४ टक्के कोरोना रुग्ण लक्षण विरहित असल्याचे समोर आले आहे. तर अवघ्या १२ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे लक्षणेविरहित रुग्ण हे कोविड कॅरिअर असू शकतात त्यांचा धोका जाणून यंत्रणांनी प्राथमिक लक्षणे असणाऱ्यांचीही तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.कोरोना (कोविड-१९) विषाणूची बाधा झाल्यानंतर साधारण ५-६ दिवसांत ताप येतो. तसेच सर्दी खोकला ही लक्षणही दिसतात. जास्तीत जास्त १५ दिवसांच्या काळात ही लक्षणे दिसू शकतात. मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते त्यांच्यात अशी लक्षणे ही दिसून येत नाही. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी केली असता कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे उघड झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येत आहे. राज्यात दररोज सात हजार चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.बाधित रुग्णाच्या सहवासितांसह संपर्कातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे नसलेली रुग्णही आढळत आहेत. यामध्ये तरुण आणि मध्यवयीन रुग्ण अधिक असल्याचे दिसते. आतापर्यंत अनेक रुग्णांमध्ये कोविडची सर्वसाधारण लक्षणे दिसत नसल्याचे समोर आले आहे.लक्षणे असलेले कोरोना रुग्ण 12%लक्षणे विरहित कोरोना रुग्ण 64%प्रकृती गंभीर असलेले कोरोना रुग्ण 1%कोरोना (कोविड१९) मुक्त रुग्ण 17%कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण 6%एकूण रुग्णसंख्येत पुरुषांचे प्रमाण 61%एकूण रुग्णसंख्येत महिलांचे प्रमाण 39%एकूण पुरुष रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण 64%एकूण महिला रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण 36%भरती असलेले ८३ टक्के रुग्ण लक्षणेविरहीतराज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात रुग्णालयात भरती असलेल्या एकूण रुग्णांपैकी ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. रुग्णालयात उपचार घेत असणाºया केवळ १५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, तर दोन टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस