Coronavirus : राज्यात आज ६,००५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९६.६६ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:21 PM2021-08-03T21:21:24+5:302021-08-03T21:24:45+5:30

Coronavirus: सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Coronavirus: 6,005 new corona patients registered in the state today, recovery rate at 96.66 per cent | Coronavirus : राज्यात आज ६,००५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९६.६६ टक्क्यांवर

Coronavirus : राज्यात आज ६,००५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९६.६६ टक्क्यांवर

Next
ठळक मुद्देराज्यात आज १७७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.राज्यात आज ६,७९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६,००५  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६,७९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१,१०,१२४  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६६ टक्के झाले आहे. राज्यात आज ६,७९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आज १७७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८५,३२,५२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२१,०६८ (१३.०२ टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण १०० च्या खाली आहेत. नंदूरबार (९), हिंगोली (६४), अमरावती (८७) वाशिम (७७), गोंदिया (९६), गडचिरोली (२२)  या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १००च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १५, ५५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर नंदूरबार, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत आज २८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!
मुंबईत गेल्या २४ तासांत २८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत ७,१२,७३३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के आहे. गेल्या २४ तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत ४,६१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर १,५५५ दिवसांवर गेला आहे. 

Web Title: Coronavirus: 6,005 new corona patients registered in the state today, recovery rate at 96.66 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.