शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांवर, आज 552 नव्या रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 20:39 IST

आज राज्यात 552 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 5218 झाली आहे.

ठळक मुद्देआज राज्यात 552 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 5218आज अजून 19 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृतांचा आकडा 251 वरआतापर्यंत 722 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

मुंबई -  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा वेग आजही कायम राहिला आहे. आज राज्यात 552 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा पाच हजाराच्या वर पोहोचला आहे. तर आज अजून 19 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृतांचा आकडा 251 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 722 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

 राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज राज्यात 552 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 5218 झाली आहे. 150 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 722 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 4245 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत. तर 5218 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 99 हजार 569 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 7,808 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 251 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील 12, पुण्यातील 3, ठाणे मनपामधील 2 तर सांगली येथील 1 आणि पिंपरी चिंचवड येथील 1 रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 10 पुरुष तर 9  महिला आहेत. त्यात 60 वर्षे किंवा त्यावरील 9 रुग्ण आहेत तर 9  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर 1 रुग्ण 40 वर्षांखालील आहे.  या 19 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई