शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

CoronaVirus News: कोरोनामुळे राज्यातील ४५ पोलिसांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 2:33 AM

१ हजार ३३ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू

मुंबई : राज्यभरात कोरोनामुळे बुधवारी पहाटेपर्यंत ४५ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ३३ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.      राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा कमी होत असला तरी संकट कायम आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या राज्यातील ४५ पोलिसांपैकी २९ जण मुंबई पोलीस दलातील आहेत. मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोन हजारांहून अधिक आहे. यात बाराशेहून अधिक पोलिसांनी कोरोनावर मात केली असून काही जण पुन्हा सेवेत दाखल झाले.कामाचा ताण वाढलालॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर स्ट्रीट क्राईमनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हानही पोलिसांवर आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. जीव धोक्यात घालून पोलीस आरोपींना पकडत जरी असले तरी, आरोपीच कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने पोलिसांना क्वॉरंटाईन होण्याची वेळ ओढावत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच कुर्ला पोलिसांनी लुटीच्या गुन्ह्यात चौकडीला अटक केली. त्यात एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला पकडणाऱ्या पोलिसांना क्वॉरंटाईन व्हावे लागले. यापूर्वी बांगुरनगर पोलीस ठाण्यातही असाच प्रकार घडला होता.सव्वा लाख गुन्ह्यांची नोंदराज्यभरात पोलिसांकडून विनाकारण घराबाहेर पडणे, नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी १ लाख ३१ हजार ३७७ गुन्हे नोंद झाले आहेत. तर विविध कारवाईत ८२ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. बंदोबस्तादरम्यान पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी २६८ गुन्हे नोंद झाले असून ८५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या