शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा मोठी वाढ, तब्बल ४२२ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 21:47 IST

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे झाले आहे.

मुंबई - राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आज पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे ११ हजार ११९ रुग्ण सापडले. तसेच गेल्या २४ तासांत राज्यामध्ये तब्बल ४२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. आज ११ हजार ११९ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह (१८.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.राज्यात आज निदान झालेले ११,११९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४२२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९३१ (४९), ठाणे- १३१ (४), ठाणे मनपा-१६४ (१८), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१२ (१०), उल्हासनगर मनपा-८ (५), भिवंडी निजामपूर मनपा-९ (२), मीरा भाईंदर मनपा-१५१ (२), पालघर-१०९, वसई-विरार मनपा-१५५ (३), रायगड-२५५ (२५), पनवेल मनपा-१६७ (३६), नाशिक-१५६ (११), नाशिक मनपा-५११ (५), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-२२० (७),अहमदनगर मनपा-३१५ (१०), धुळे-६० (२), धुळे मनपा-३६ (२), जळगाव-३९९ (१०), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-३७ (३), पुणे- ४१८ (१६), पुणे मनपा-१२६७ (५४), पिंपरी चिंचवड मनपा-७४७ (१९), सोलापूर-३२८ (११), सोलापूर मनपा-१०८ (२), सातारा-३५३ (११), कोल्हापूर-३३४ (११), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-१५४ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (६), सिंधुदूर्ग-४१ (१), रत्नागिरी-१४० (३), औरंगाबाद-११५,औरंगाबाद मनपा-१३१, जालना-६३, हिंगोली-१९ (२), परभणी-४४ (१), परभणी मनपा-५४, लातूर-८१ (३), लातूर मनपा-१०१ (१), उस्मानाबाद-१०२ (४), बीड-११६ (६), नांदेड-१०६ (२), नांदेड मनपा-१५१, अकोला-२ (२), अकोला मनपा-८ (१), अमरावती-५१ (१), अमरावती मनपा-८२ (३), यवतमाळ-७३, बुलढाणा-१०१ (१), वाशिम-२४, नागपूर-१५६ (७), नागपूर मनपा-६५६ (२७), वर्धा-१४, भंडारा-५५, गोंदिया-२४, चंद्रपूर-९ (१), चंद्रपूर मनपा-७ (१), गडचिरोली-११, इतर राज्य ७ (२).

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई