शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गेल्या १२ तासांत ७ पॉझिटिव्ह; पण 'ही' आकडेवारी राज्यासाठी काहीशी दिलासादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:57 IST

Coronavirus राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर

मुंबई: राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक असला तरी, संसर्गाचं प्रमाण कमी आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४९ रुग्ण आहेत. मात्र यातले ४० रुग्ण परदेशातून राज्यात आले आहेत. या लोकांच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या केवळ ९ इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. गेल्या १२ तासांत राज्यात कोरोनाचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोपेंनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या वाढली आहे. ४९ कोरोनाबाधितांपैकी ४० जण परदेशातून आलेले आहेत. त्यांना परदेशात असताना कोरोनाची बाधा झाली. ते इथे आल्यावर त्यांच्या माध्यमातून संसर्ग झालेल्यांची संख्या फक्त १० आहे, असं टोपे यांनी सांगितलं.सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. केंद्रानं दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन सुरू आहे. काही वेळापूर्वीच मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी संवाद साधला. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या १२ देशांमधील लोकांना आपण प्रवेशबंदी केलीय. मात्र या देशांमधले काही लोक दुसऱ्या देशांमधून भारतात येत आहेत, ही बाब मी हर्षवर्धन यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे देशात प्रवेश देताना संबंधितांनी गेल्या महिन्याभरात केलेल्या प्रवासाचा तपशील तपासला जावा, असं मी त्यांना सुचवलं. त्यांनीही याबद्दल सकारात्मकता दर्शवलीय, अशी माहिती टोपेंनी दिली. लोकल, बससेवा बंद करणं शेवटचा पर्याय आहे. ते पाऊल उचलण्याचं सरकारची इच्छा नाही. मात्र लोकांनी गर्दी कमी केली नाही, तर आम्हाला नाईलाजास्तव ते पाऊल उचलावं लागेल, या मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंच्या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला. लोकांनी प्रवास टाळावा, अशी कळकळीची विनंती केली. मुंबईतील दोन रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत. इतरांची प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे