शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लस घेतलेल्या १८ जणांना डेल्टा प्लसची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:38 IST

CoronaVirus : एकूण रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वयोगटातील आहेत, तर त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १८ रुग्ण आहेत.

मुंबई : आतापर्यंत राज्यात ६६ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा प्लसच्या ६६ रुग्णांपैकी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या १८ जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. १८ पैकी १० जणांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, तर ८ जणांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी २ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन तर इतर १६ जणांनी कोविशिल्ड या लसीचे डोस घेतले होते.एकूण रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वयोगटातील आहेत, तर त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १८ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ७ बालके असून, ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत. ६६ पैकी ३१ रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे ३६ रुग्ण हे जळगाव, रत्नागिरी, मुंबई या तीन जिल्ह्यांत आढळून आले आहेत.विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली, इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का, याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.

पाच रुग्णांचा मृत्यू : ६६ पैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३ पुरुष, २ स्त्रिया आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २, बीड, मुंबई, रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील असून, त्यांना अतिजोखमीचे आजार होते. मृत्यू झालेल्या २ जणांनी कोविशिल्डचे डोस घेतले होते. २ जणांनी कोणतीही लस घेतली नव्हती, तर एकाच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस