शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

CoronaVirus News: सहा जिल्ह्यांत १३% लोकांना कोरोना; उपचाराविना झाले बरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:46 IST

CoronaVirus News: आयसीएमआरचा सेरो सर्व्हे; बीड, परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगावचे सॅम्पल

- सोमनाथ खताळबीड : राज्यातील सहा जिल्ह्यांतील तब्बल १३ टक्के लोकांना गेल्या सहा महिन्यांत कोरोनाची लागण झाली आणि कुठलाही उपचार न करता ते बरेही झाले. यात सर्वाधिक २५.९ टक्के रुग्ण जळगाव जिल्ह्यातील असून सर्वात कमी ७.४ टक्के बीड जिल्ह्यातील आहेत.बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, जळगाव व सांगली या सहा जिल्ह्यांत ‘आयसीएमआर’ने (इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च) २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान ‘सेरो सर्व्हे’ करून २६८१ लोकांचे सॅम्पल घेतले होते. यात ३४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून याचा टक्का १३.१२ एवढा आहे.देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी मे महिन्यात भारतीय आयुर्विज्ञान संसाधन परिषदेने याच सहा जिल्ह्यांत पहिला सेरो सर्व्हे केला होता. यात १५९३ लोकांच्या रॅपिड टेस्ट केल्या असता २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात दुसरा सर्व्हे करण्यात आला. ६० गावांमधील तब्बल २,६८१ लोकांचे सॅम्पल घेतले होते. यात ३४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आयसीएमआरचे बलराम भारगवा यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना याचा अहवालही दिला आहे.मास्क, सोशल डिस्टन्सिंग गरजेचेबीडसह राज्यातील सहा जिल्ह्यांत आयसीएमआरकडून सेरो सर्व्हे करण्यात आला होता. बीड जिल्ह्यातही झाला होता. समजलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाबत आणखी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची गरज आहे. मला काही होत नाही, हा गैरसमज मनातून काढावा. काळजी करू नका, पण काळजी घ्या.- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीडएक नजर आकडेवारीवरजिल्हा सॅम्पल पॉझिटिव्ह टक्काबीड ४४३ ३३ ७.४परभणी ४८० ७३ १५.२नांदेड ४३९ ४३ ९.८सांगली ४६७ ५५ ११.७अहमदनगर ४४७ ३९ ८.७२जळगाव ४०५ १०५ २५.९एकूण २६८१ ३४८ १३.१२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या