शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

CoronaVirus: आजपासून १० कारागृहे लॉकडाऊन- अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 03:58 IST

औरंगाबाद शहरात संचारबंदी कडक करण्याचा विचार

औरंगाबाद : कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. हर्सूल मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील १० कारागृहे आजपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात येत आहेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी येथे सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी देशमुख शनिवारी रात्री औरंगाबादेत दाखल झाले होते. रविवारी सकाळी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कारागृहांमध्ये कैदी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आजपासून प्रमुख १० कारागृहांमध्ये लॉकडाऊन केले जाणार आहे. लॉकडाऊन उठेपर्यंत आत असलेले कैदी, पोलीस कर्मचारी आतच राहतील. कारागृहाचे काम तीन पाळ्यांमध्ये चालते. आजपासून रात्रपाळीला गेलेले पोलीस बाहेर येणार नाहीत. त्यांची सर्व व्यवस्था आतच केली जाईल. औरंगाबादला संचारबंदी अधिक कडक करण्याचा विचार सुरू आहे. तीव्रतेनुसार ३ झोनमध्ये शहर विभागणी केली आहे.येणाºया नवीन कैद्यांचे काय?कारागृहे लॉकडाऊन केल्यानंतर नवीन येणाºया कैद्यांची कुठे व्यवस्था करणार, या प्रश्नावर हर्सूल मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव म्हणाले की, हर्सूल मध्यवर्ती कारागृहाबाहेर एक स्वतंत्र बरॅक तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये नव्याने दाखल कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कारागृहात अगोदरपासून असलेल्या कैद्यांसोबत नवीन कैद्यांचा संपर्क टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुख