शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ७.४१ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 02:04 IST

रुग्ण बरे होण्यात राज्य अव्वल : ‘पॉझिटिव्ह’ प्रमाण एक टक्क्याने घटले

मुंबई/औरंगाबाद : राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण आठवडाभरात १.४० टक्क्याने वाढून ७.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्या तुलनेत जागतिक व देशातील मृत्यूचे प्रमाणही ०.७१ टक्क्याने वाढले. जागतिक प्रमाणापेक्षा महाराष्ट्राचे मृत्यूचे प्रमाण अधिक आढळून आले. राज्यातील होत असलेल्या तपासण्यांतून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ५ वरून ४ टक्के झाले आहे.

महाराष्ट्रात सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या आणि कोरोना मृत्यूचा आकडा सर्वाधिक असताना रुग्ण बरे होण्याची संख्याही राज्यातच सर्वाधिक असल्याचे सोमवारी समोर आलेल्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या विश्लेषण अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, गेल्या आठवड्यापर्यंत एकही मृत्यू नसलेल्या झारखंडमध्ये दोन मृत्यू होऊन मृत्यूचे प्रमाण १०.५३ टक्के होऊन अव्वल स्थानी आले. त्यानंतर महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात आहे. राज्यात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांत महिला ३९ तर पुरुष ६१ टक्के आहेत. त्यात महिलांतील मृत्यूचे प्रमाण ३३ तर पुरुषांतील ६७ टक्के आहे. शासकीय प्रयोगशाळांच्या २२ हजार ७०७ मधून १२३३ रुग्ण तर १७ हजार १८ स्वॅबमधून ५२८ रुग्ण खाजगी प्रयोगशाळांच्या तपासण्यांतून पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. यापैकी २ टक्के रुग्ण क्रिटिकल असून १४ टक्के रुग्ण बरे झाले.शंभरीपारही एक कोरोनाबाधित१- १० वयोगटामध्ये ६६ रुग्ण असून, हे प्रमाण ३.७५ टक्के, ११-२० वयोगटामध्ये १२७ रुग्ण, २१-३० वयोगटामध्ये ३५१, ३१-४० वयोगटामध्ये ३२८, ४१-५० वयोगटामध्ये ३५२, ५१-६० वयोगटामध्ये २७५, ६१-७० वयोगटामध्ये १७०, ७१-८० वयोगटामध्ये ६७, ८१-९० वयोगटामध्ये २०, ९१-१०० वयोगटामध्ये ४, १०१-११० वयोगटामध्ये १ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. यात प्रामुख्याने विशीत १९.३३ टक्के, तिशीत १८.६३, चाळिशीत १९.९९ तर पन्नाशीतील १५.६२ टक्के प्रमाण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबाद