शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

कोरोनाचे सावट, तरीही कोकण किनारे गजबजले, ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 06:38 IST

Tourists : ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने कडक केलेले निर्बंध पाळून नववर्ष स्वागताची धूम साजरी करण्यासाठी पर्यटक सज्ज झाल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्ग : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी कोकणातील सागर किनारे गजबजून गेले आहेत. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने कडक केलेले निर्बंध पाळून नववर्ष स्वागताची धूम साजरी करण्यासाठी पर्यटक सज्ज झाल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्गमधील तारकर्ली, देवबाग, भोगवे, निवती, शिरोडा, कोंडुरा, खवणे, आचरा, देवगड, कुणकेश्वर, मिठमुंबरी या समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. वाॅटर स्पोर्ट्स, समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जासुद्धा अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत. बच्चे कंपनीबरोबरच त्यांचे पालकही समुद्र किनाऱ्यावर मस्त बागडताना दिसत आहेत. 

पालघरच्या समुद्र किनाऱ्यावरही गर्दीपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या किनाऱ्यांंवर पर्यटकांची गर्दी दिसत आहे. सेलिब्रेशन पार्ट्यांवर नियमांचे बंधन असल्याने येथील हॉटेलचालकांनी कार्यक्रमच रद्द केल्याचे सांगितले. शिवाय रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी असल्याने समुद्रकिनारी व सुरू बागांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. दमण व सेलव्हासा येथून येणाऱ्या अवैध दारूवर सीमा भागात कडक कारवाई सुरू आहे.

नियमावलीबाबत पोलीस दक्षनाताळ, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत यासाठी सुमारे पाच लाख पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी दाखल झाले आहेत. पर्यटकांकडून एमटीडीसीच्या निवासस्थानांना प्राधान्य दिले जात असल्याने जिल्ह्यातील ही निवासस्थाने १०० टक्के भरलेली आहेत. ओमायक्राॅनच्या अनुषंगाने नियमावली जाहीर करण्यात आली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्गpalgharपालघर