शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नियोजित लसीकरण मोहीम रद्द नाही; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 08:56 IST

तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण मोहीम १८ जानेवारीपर्यंत स्थगित करण्याचं वृत्त माध्यमांमधून झालं होतं प्रकाशित

ठळक मुद्देको-विन अॅपमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचं आलं होतं सांगण्यातमोहीम नियोजनाप्रमाणेच सुरू राहणार, आरोग्य विभागाची माहिती

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस केव्हा उपलब्ध होणार याची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं दोन लसींना परवानगी दिल्यानंतर शनिवारपासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचा प्रारंभ केला. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारपासून देशातील अन्य भागांसह मुंबईत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडलं. परंतु त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण रद्द केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. परंतु ही मोहीम रद्द केली नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. "महाराष्ट्रातआरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कोणतेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात  आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे," असं स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आलं आहे. कोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. कोरोनाविरोधातील लसीकरणाची नोंदणी ठेवणारे को-विन हे अ‍ॅप डाऊन झाले आहे. तसेच लसीकरणाच्या ऑफलाइन नोंदणीस सध्या मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या तांत्रिक बिघाडामुळे रविवारी आणि सोमवारी होणारी लसीकरणाची मोहीम रद्द करावी लागल्याचं वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य