Corona Virus:...आम्हाला लवकर मायदेशात न्या; इराणमध्ये अडकलेल्या पर्यटकांची विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 05:30 AM2020-03-11T05:30:42+5:302020-03-11T06:40:37+5:30

कोरोना व्हायरसच्या दहशतीने परदेशी आणि देशांतर्गत सहलींची जवळपास ९0 टक्के आरक्षणे कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहेत.

Corona Virus:... take us home soon; Request from tourists stranded in Iran | Corona Virus:...आम्हाला लवकर मायदेशात न्या; इराणमध्ये अडकलेल्या पर्यटकांची विनवणी

Corona Virus:...आम्हाला लवकर मायदेशात न्या; इराणमध्ये अडकलेल्या पर्यटकांची विनवणी

Next

कोल्हापूर : येथील आल्हाददायक वातावरणापेक्षा भारतातील वातावरण केव्हाही चांगले आहे. त्यामुळे आम्हाला इथून लवकरात लवकर मायदेशी परत न्या, अशी आर्त विनवणी इराणमध्ये गेल्या २० दिवसांपासून अडकलेल्या कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील ४४ पर्यटकांनी केली आहे.

वैद्यकीय पथक दाखल होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप पर्यटकांची तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्यांची घालमेल वाढली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दूरध्वनीवरून पर्यटकांची विचारपूस करून दिलासा दिला. तसेच त्यांनी पर्यटकांना भारतात आणण्यासंदर्भात लवकर कार्यवाही करावी, असे पत्र केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिले आहे. तेहरान, इराणमध्ये अडकलेले पर्यटक हे कोेल्हापूर, सांगली, अकलूज (सोलापूर), पुणे येथील आहेत. कोरोना विषाणू भीतीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीसाठी भारतातून गुरुवारी (दि.५) पथक इराणमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये तीन तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. पाच दिवस झाले तरी अद्याप या पथकाकडून पर्यटकांची तपासणी करण्यात आलेली नाही.

या संदर्भात सहल आयोजक मुन्ना सय्यद हे वरचेवर जाऊन भारतीय वकिलातीमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. आम्हाला मायदेशी लवकरात लवकर न्यावे, अशी आर्त विनवणी या पर्यटकांनी केली आहे. नुकतेच इराणमध्ये अडकलेले ५०हून अधिक काश्मीरसह आसपासच्या भागातील पर्यटक भारतीय वायूसेनेच्या विमानातून भारतात दाखल झाले.

परदेशी, देशांतर्गत सहलींना ‘कोरोना’चा फटका
सांगली : कोरोना व्हायरसच्या दहशतीने परदेशी आणि देशांतर्गत सहलींची जवळपास ९0 टक्के आरक्षणे कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहेत. गेल्या कित्येक वर्षात हवाई वाहतूक, ट्रॅव्हल्स्च्या तिकीटदरात घसरण होऊनही प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना फटका बसला आहे. देशात, राज्यात साखळी पद्धतीने काम करणाºया टूर्स आणि ट्रॅव्हल्स एजन्सीज्ची संख्या सांगली जिल्ह्यात विस्तारली आहे. गेल्या आठ वर्षात परदेशी सहलींचे प्रमाण वाढत आहे.

Web Title: Corona Virus:... take us home soon; Request from tourists stranded in Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.