शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणासाठी खाजगी डॉक्टरांचा समावेश होणार; राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 18:42 IST

शासनाने १ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांना प्रस्तावित कोरोना लसीकरणातून वगळले होते.

पुणे : राज्य सरकारने अखेर महाराष्ट्रातील सर्व खासगी डॉक्टरांना कोरोना लसीकरणाच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे मान्य केले आहे. बुधवारी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शासनाने १ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांना प्रस्तावित कोरोना लसीकरणातून वगळले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनने या दुजाभावाचा निषेध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी पत्रव्यवहार करून खेद व्यक्त केला होता. अखेर शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्व डॉक्टरांना प्रस्तावित कोरोना लसीकरण डेटाबेसमध्ये समाविष्ट केले जाईल, असे आयएमएला कळवले.            ४ नोव्हेंबर रोजी आयएमए महाराष्ट्राशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ.शिवकुमार उत्तुरे आणि महाराष्ट्रातील आयएमएच्या सर्व शाखांचे अध्यक्ष व सचिव यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. डी.एन.पाटील यांनी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी यांच्याविषयीची माहिती अपलोड करण्याची कार्यपद्धती सविस्तरपणे समजावून सांगितली.

महाराष्ट्रातील सर्व खाजगी डॉक्टर ही माहिती लसीकरण डेटाबेस वेबसाइटवर अपलोड करतील आणि १२ नोव्हेंबरपर्यंत संबंधित जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनना सादर करतील, असे या बैठकीत ठरवण्यात आले, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकार