महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आणि पालिका क्षेत्रांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात येत आहे. परंतु अशातच पुन्हा एकदा बुधवारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत राज्यात १३ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत १,५३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. परंतु बुधवारी गेल्या पाच पहिन्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये ९,९१३ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं. तसंच ५४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यात ९९ हजार ००८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी हाराष्ट्रात सर्वाधिक ११ हजार रूग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या दिवशी राज्यात ११ हजार ४४७ नवे रुग्ण सापडले होते.
राज्यात पाच महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद; सापडले १३ हजारांपेक्षा अधिक बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 22:29 IST
Coronavirus In Maharashtra : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होत आहे वाढ
राज्यात पाच महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद; सापडले १३ हजारांपेक्षा अधिक बाधित
ठळक मुद्दे २४ तासांत राज्यात १३ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंदराज्यात ९९ हजार ००८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत