शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : तिसरी लाट रोखण्यासाठीआशा सेविकांकडून आशा, मुख्यमंत्र्यांचा ७० हजार सेविकांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 05:22 IST

Corona Virus : मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला.

मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशा सेविकांकडून मुख्यमंत्री म्हणून मला मोठी आशा आहे. आजवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यातही त्यांची मोठी भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले. 

मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये  मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेल्या यशाचे तुम्ही शिलेदार आहात. आपले तसेच अंगणवाडी सेविकांचे प्रश्न नक्कीच सोडविले जातील. मला थोडा वेळ द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. साथीच्या रोगांची लक्षणे आढळल्यास आशा सेविकांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी.

कोरोनाव्यतिरिक्त कुपोषणाचे संकट आहे, त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे. राज्य शासनाच्या कोरोनामुक्त गाव मोहिमेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. तज्ज्ञांच्या मतांनुसार कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार असून ती रोखण्यासाठी आशाताईंची भूमिका महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका ऑनलाइन परिषदेत सहभागी झाल्या होत्या. मुरबाड येथील रोहिणी भोंदिवले, पातोंडा (जि. नंदुरबार) येथील साधना पिंपळे, भंडारा येथील भूमिका बंजारी, हिंगोली येथील सुनीता कुरवडे या आशा सेविकांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस