शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Corona vaccine : कोरोनाची लस घ्या अन् प्रमाणपत्र जपून ठेवा! आरोग्य विमा, पासपोर्टसाठी आवश्यक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 18:02 IST

Corona vaccine: आरोग्य विभागामार्फत सध्या मोफत तसेच काही खासगी केंद्रांमध्ये सशुल्क कोरोना लस दिली जात आहे. कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लस घेण्यासाठी नागरिकही जबाबदारीने गर्दी करीत आहेत.

यवतमाळ : सध्या कोरोनाची लस घेण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. मात्र लस घेतल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र पुढील काळात अत्यंत आवश्यक ठरणार असल्याने ते जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य विभागामार्फत सध्या मोफत तसेच काही खासगी केंद्रांमध्ये सशुल्क कोरोना लस दिली जात आहे. कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लस घेण्यासाठी नागरिकही जबाबदारीने गर्दी करीत आहेत. मात्र लस घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. तर लसीकरणानंतर मिळणारे प्रमाणपत्र किंवा पोच पावती जपून ठेवण्याचीही गरज आहे. कारण नजिकच्या भविष्यात आरोग्य विमा कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले जाण्याची दाट शक्यता आहे. असे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय विम्याचा लाभ न मिळण्याची किंवा विम्याच्या प्रिमियमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशावेळी कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील १३ आकडी संदर्भ क्रमांक जवळ बाळगणे फायद्याचे ठरू शकणार आहे. तसेच पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी, आंतरराज्यीय प्रवासासाठीही या प्रमाणपत्राची विचारणा होऊ शकते. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हॉटेलमध्ये ॲडमिशन, ऑपरेशन आदीच्या वेळीही कोरेाना लसीकरणाच्या प्रमाणपत्राची गरज भासण्याची शक्यता आहे. अधिकारी म्हणतात...यासंदर्भात एलआयसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनीही दुजोरा दिला. विशेषत: खासगी विमा कंपन्यांकडून मेडिक्लेम पाॅलिसींकरिता कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र मागितले जाणार आहे. तर एलआयसीच्या जीवनआरोग्य विम्यासाठीही ते गरजेचे ठरणार आहे, असे एलआयसीच्या मार्केटिंग विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र वरिष्ठ शाखा प्रबंधक दिलेश बागडे म्हणाले की, याअनुषंगाने लाभार्थ्यांकडून एक फाॅर्म भरून घेतला जातो. त्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्र हे कम्पलसरी केलेले नाही. परंतु, आमच्या गाइडलाइन दर आठवड्याला बदलतात. यापुढे त्यात बदल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र