शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Corona Vaccination: दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:07 IST

Corona Vaccination two dose gap: दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास दुष्परिणाम होणार का? पुन्हा लस घ्यावी लागणार का? असे प्रश्न मनात येत आहेत.

- स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे शहर-उपनगरातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे, मात्र हे लोक दुसरा डोस मिळण्याची वाट पाहत आहेत. दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास दुष्परिणाम होणार का? पुन्हा लस घ्यावी लागणार का? असे प्रश्न मनात येत असताना या डोसला विलंब झाल्यास हरकत नाही, त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, लसीचा पहिला डोस इम्युन सिस्टीम तयार करतो व विषाणूविरोधात प्रतिपिंड तयार करायला सुरुवात करतो. अशा परिस्थितीत या प्रक्रियेला जेवढा अधिक वेळ लागेल तेवढी चांगली प्रतिक्रिया दुसऱ्या डोसमधून मिळते. लसीच्या दोन डोसमधील जास्त अंतर हे सर्वच लसींच्या बाबतीत फायदेशीर ठरते.

कोविशिल्डचा तुटवडा अधिकमुंबई पालिकेकडून कोविशिल्ड ही लस अधिक दिली जाते. त्यामुळे या लसीच्या डोसचा तुटवडा सातत्याने जाणवतो. कोव्हॅक्सिन या लसीचा साठा मर्यादित असतो. तर स्पुतनिक ही लस पालिकेकडे नाही. पालिकेच्या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक खंड हा कोविशिल्ड लसीचा तुटवडा असल्याने येत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकांनी संयम राखावालसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे हे खरे आहे. मात्र कोणत्याही कारणास्तव दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यास घाबरून जाऊ नये. एखादा आठवडा वगैरे उशीर झाल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे लोकांनी संयम राखावा. लसीच्या साठ्याचा पुरवठा नियमित होण्यासाठी केंद्राकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे, याची लवकरच अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे, असे मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस