शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Corona vaccination: राज्यात आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांना मिळाले लसीचे दाेन्ही डाेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 11:36 IST

Corona vaccination In Maharashtra: लस पुरवठ्यातील सततच्या अडथळ्यांमुळे राज्यात लसीकरण कासव गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले, म्हणजेच या लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले.

मुंबई - लस पुरवठ्यातील सततच्या अडथळ्यांमुळे राज्यात लसीकरण कासव गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले, म्हणजेच या लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले. आतापर्यंत केवळ ३४ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या ४५ हून अधिक वय असणारे २.५ कोटी नागरिक लसीच्या पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.राज्यात अजूनही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या लसीचे डोस पूर्ण झालेले नाहीत. १.३८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजूनही कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही, तर २३ हजार कोव्हॅक्सिन लसीचे आरोग्य कर्मचारी लाभार्थीही दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.राज्यात १७.८५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यातील ९२ टक्के म्हणजेच १६.४९ लाख फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला; परंतु अजूनही ८९ हजार फ्रंटलाइन कर्मचारी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रंटलाइन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा व स्थानिक पातळीवरील प्रशासनाला दिले आहेत.लसीच्या दोन्ही डोसमधील अंतरही वाढल्यामुळे लसीकरण प्रक्रियेची गती मंदावल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. याविषयी, राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, ६० हून अधिक वय असणाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजे. त्यांनतर ४५ हून अधिक वय असणाऱ्या, अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर ७६ टक्के रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. पुढील ३-४ महिन्यांत संवेदनशील गटातील ७० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. 

राज्यात सक्रिय रुग्ण तीन लाखांच्या खालीमुंबई : राज्यात दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५३ लाख ७ हजार ८७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दुसरीकडे शुक्रवारी २० हजार ७४० रुग्ण आणि ४२४ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२४ टक्के झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या खाली गेली आहे. सध्या २ लाख ८९ हजार ८८ रुग्ण उपचाराधीन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४३ लाख ५० हजार १८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.५७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २१ लाख ५४ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १६ हजार ७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात ५६ लाख ९२ हजार ९२० कोरोना बाधित असून, मृतांची संख्या ९३ हजार १९८ झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.६४ टक्के आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस