शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : महाराष्ट्रात 47 लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस; औरंगाबादमध्ये ६.२६ लाख डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 05:53 IST

Corona Vaccination : ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ६९.४३ लाख आणि १८ ते ४४ वयोगटात ३९.७० लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या. ८९.६२ लाख महिलांना लसीची एक मात्रा दिली गेली आहे.

ठळक मुद्देआरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २.४१ कोटींपेक्षा जास्त लस मात्रा दिल्या गेल्या.

नवी दिल्ली : महाराष्ट्राने कोरोना लसीकरण मोहिमेत इतर सगळ्या राज्यांना मागे टाकले आहे. राज्यात २.४० कोटींपेक्षा जास्त लस मात्रा दिल्या गेल्या, असे नाही तर ४७.८३ लाखांपेक्षा जास्त लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा दिलेले राज्य बनले आहे.आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २.४१ कोटींपेक्षा जास्त लस मात्रा दिल्या गेल्या. त्यात १.९३ कोटी लोकांना कमीत कमी एक मात्रा दिली गेली, तर ४७.८३ लोकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. ४५ ते ६० वयोगटात दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला मंजुरी मिळाली. परंतु, या वर्गात सर्वांत जास्त ८४.३३ लाख मात्रा दिल्या गेल्या. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ६९.४३ लाख आणि १८ ते ४४ वयोगटात ३९.७० लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या. ८९.६२ लाख महिलांना लसीची एक मात्रा दिली गेली आहे. ६ जूनपर्यंत अशा पुरुषांची संख्या १.०३९ कोटी होती. एकूण लसीकरणात कोविशिल्डच्या २.११ कोटींपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. या मात्रा २९.५४ लाख कोव्हॅक्सिन मात्रांच्या तुलनेत बऱ्याच जास्त आहेत. 

३.५० लाख जणांना शनिवारी लस राज्यात रविवारी लसीकरणाचा वेग अपेक्षापेक्षा मंद होता. दुपारपर्यंत १६५७ केंद्रांवर फक्त ८१,८०३ मात्रा दिल्या गेल्या. शनिवारी लस घेणाऱ्यांची संख्या ३.४९ लाख होती. त्या दिवशी ३८२२ सरकारी आणि ३४७ खासगीसह एकूण ४१६९ केंद्रांवर लसीकरण केले.

३९८ जणांना गंभीर समस्याया दरम्यान ३९८ जणांना लस घेतल्यानंतर गंभीर तक्रारी होत्या.  राज्यात लसीकरण मोहिमेत  हे प्रमाण फक्त.०२१ टक्के आहे.

मुंबईत सर्वाधिक, हिंगोलीत सगळ्यात कमी लसीकरणज्या जिल्ह्यांत सर्वाधिक लस मात्रा दिल्या गेल्या, त्यात मुंबई (३७.०१ लाख), पुणे (३१.०७ लाख) आणि ठाण्याचा (१८.२० लाख) समावेश आहे. नागपूर १३.१७ लाख, कोल्हापूर १२.०५ लाख, नाशिक १०.४२ लाख आणि साताऱ्यात ७.८३ लाख लस मात्रा दिल्या गेल्या. औरंगाबाद ६.२५ लाख, हिंगोली  १.४५ लाख, गडचिरोली १.७१ लाख आणि सिंधुदुर्ग येथे २.२६ लाख लस मात्रा दिल्या.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस